Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आतापर्यंत ४ लाख ३८ हजार ७५१ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री

4 lakh 38 thousand 751 customers
मुंबई , शुक्रवार, 29 मे 2020 (07:36 IST)
15 मे 2020 पासून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात येत आहे. 15 मे 2020 ते 28 मे 2020 या काळात 4 लाख 38 हजार 751 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आली.  दिवसभरात 55 हजार 368 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आली. यापैकी मुंबई शहर आणि  मुंबई उपनगरात 30 हजार 707 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात  आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.
 
मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर, राज्यात एकूण 10,791 किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्ती पैकी 7,176 अनुज्ञप्ती सुरू आहेत.
 
राज्य शासनाने 3 मे, 2020 पासून लॉकडाऊन कालावधीत सीलबंद मद्यविक्री सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेली आहे. राज्यात 15 मे पासून घरपोच मद्यविक्री योजना अंमलात आली असून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात येत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने तयार केलेल्या https://aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थलावरऑनलाईन मद्यसेवन परवाना प्राप्त करण्याची सुविधा उपलब्ध आहे. 1 मे 2020 ते 26 मे 2020 या काळात 1 लाख 07 हजार 098 ग्राहकांनी मद्यसेवन परवाने मिळविण्यासाठी अर्ज केले होते; यापैकी 92 हजार 612 ग्राहकांना परवाने मंजूर करण्यात आले आहे.
 
ऑनलाईन मद्यसेवन परवाना घेतांना येतअसलेल्या सर्व तांत्रिक अडचणींची सुधारणा करण्यात आली असूनआता इच्छुक व्यक्ती संगणक, लॅपटॉप, अँड्रॉइड फोन, तसेच IOS प्रणालीद्वारे ऑनलाईन परवाने घेऊ शकतात. तसेच कोणाला ऑनलाईन परवाना घ्यायाचा नसेल तर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सर्व अधीक्षक/निरीक्षक/दुय्यम निरीक्षकांच्या कार्यालयात दररोज मद्यसेवन परवाने Offline पद्धतीने सुद्धा उपलब्ध आहेत. सदर मद्यसेवन परवाने एक वर्षाकरीता रु. 100/- किंवा आजीवन परवान्याकरीता रु. 1,000/- एवढे शुल्क अदा करुन मिळू शकतात. तरी मद्यविक्री करणाऱ्या दुकानांसमोर गर्दी न करता मद्यसेवन परवाने घेऊन मद्य घरपोच सेवेचा लाभ घ्यावा.
 
दि.24 मार्च, 2020 पासून राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. महाराष्ट्र राज्यात शेजारील राज्यांमधून होणारी अवैध मद्य तस्करी रोखण्यासाठी सर्व विभागीय उप आयुक्त तसेच संबंधित अधीक्षकांनी नाकाबंदी केली असून 12 सीमा तपासणी नाक्यांवर विभागातील अधिकारी/कर्मचारी तैनात आहेत. दि.26 मे, 2020 रोजी राज्यात 92 गुन्हे नोंदविण्यात आले असून 36 आरोपींना अटक करण्यात आली असून 31 लाख 34 हजार रूपये किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
 
दि.24 मार्च, 2020 पासून दि.26 मे, 2020 पर्यंत लॉकडाऊन काळात राज्यात एकूण 6,424 गुन्हे नोंदविण्यात आले असून 2,994 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 635 वाहने जप्त करण्यात आली असून 17 कोटी 33 लाख रुपये किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
 
अवैध मद्य निर्मिती वाहतूक, विक्री विरुद्ध तक्रार स्वीकारण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष 24X7 सुरू आहे. त्यावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते.  यासाठी टोल फ्री क्रमांक – १८००८३३३३३३  व्हाट्सॲप क्रमांक – ८४२२००११३३ हा असून commstateexcise@gmail.com  ई-मेल आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'या' राज्यांना कर्नाटकात नो एन्ट्री